Wednesday, 1 October 2025

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमात मार्गदर्शन कार्यक्रम



जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमात मार्गदर्शन कार्यक्रम

चंद्रपूरदि. 01 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमदेवाडा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेया कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यासमुपदेशन तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीर्थदर्शन योजनावयोश्री योजना यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आलीतसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार (2005 चा कायदा) या विषयावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

समुपदेशक अतुल शेंद्रे यांनी वृद्धांच्या सामाजिकमानसिक व आरोग्य विषयक अडचणींवर उपाययोजना आणि ताण-तणाव कमी करण्याच्या उपायांवर मार्गदर्शन केलेकार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलायावेळी डी.आरधात्रकज्योती शेंडेपूनम आसेगावकरश्वेता लखावारवैशाली ठाकरेसचिन राउतसंदीप रामटेकेसुजल कांबळेसंदीप वाढईराहुल आकुलवारगणेश खोटेविनोद सोनुलेचेतना खाडीलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावडे यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी मानलेशेवटी सर्व वृद्धांना फळेमिठाई व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

०००००००

No comments:

Post a Comment