Friday, 31 October 2025

सीसीआयचे ‘कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू

 

सीसीआयचे कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू

               चंद्रपूरदि. 31 :  भारतीय कापूस महामंडळ (सीसीआयने ‘कापूस  किसान मोबाईल ॲप’ नावाचे एक मोबाईल ॲप्लीकेशन  सुरू केले आहेसदर ॲप कापूस हंगामात 24 तास व दिवस उपलब्ध असेल.

          कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे नोंदणी व स्लॉट बुकींग प्रक्रियेस मदत करण्यासाठी एक विशेष लिंक तयार करण्यात आली आहेअॅपमध्ये नोंदणी व स्लॉट बुकींगसाठी सविस्तर माहिती व पायऱ्या  दिलेल्या आहेत.    शेतक-यांनी https://www.youtube.com/@KapasKisan-Official या लिंकवर क्लिक करून स्थानिक भाषेत तयार केलेली माहिती व व्हिडीओ पहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे स्लॉट बुकींग प्रक्रिया : स्लॅाट बुकिंग सुविधा दिवसाच्या रोलिंग बेसिसवर खुली राहीलप्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल,  दुसऱ्या  दिवशी नवीन तारीख खुली केली जाईलउद्धघाटनाच्या दिवशी सुट्टी नसेलमहाराष्ट्र राज्याकरीता स्लॉट बुकींगची  वेळ पूढीलप्रमाणे असेल,

           अकोला व औरंगाबाद  शाखा स्लॉट सुरु होण्याची वेळ दररोज सकाळी 10 वाजतासर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.  तसेच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकींग करणे आवश्यक आहेअधिक माहितीकरीता 07239-228114 या दूरध्वनीवर संपर्क करावाअसे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ वणीचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक डी.बीदोईजोड यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment