Thursday, 16 October 2025

जिल्हा परिषदेत ‘संविधान गॅलरी’चे उद्घाटन

 


जिल्हा परिषदेत ‘संविधान गॅलरीचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 16 : भारतीय संविधानाची महती ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये संविधानिक मूल्यांविषयी जागृती निर्माण करण्याच्या हेतूने  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदचंद्रपूर येथे संविधान गॅलरी’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वनसंरक्षक एमरामानुजनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.

जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विविध योजना आणि कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेया विकासकार्यात ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेस भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय असतेया नागरिकांना संविधानाचे महत्त्व सोप्या आणि आकर्षक पद्धतीने समजावेया विचारातून 'संविधान गॅलरी'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'संविधान गॅलरीहा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना भारतीय संविधानाची मूलतत्त्वेहक्क आणि कर्तव्ये यांची माहिती देऊन त्यांना एक जबाबदार नागरिक बनण्यास प्रोत्साहित करेलही गॅलरी जिल्हा परिषदेला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान ठरेल.

कार्यक्रमाचे संचालन आणि उपस्थितांचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी मानले. 'संविधान गॅलरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागरप्रकल्प संचालक मंजिरी टकलेमुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र.) नुतन सावंतमीना साळुंखे (ग्रापं), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेशिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणेराजेश पातळे (माध्य.), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाविभागवत तांबे आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment