Monday, 1 December 2025

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण

 जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नवीन लोगोचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 01 : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयचंद्रपूर यांच्या वतीने आज नवीन अधिकृत लोगोचे लोकार्पण करण्यात आलेहा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांच्या हस्ते संपन्न झालायावेळी  कार्यालयातील तांत्रिक व आस्थापना  विभागांतील अधिकारी  व कर्मचारी  उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेतउत्तरदायित्वात आणि नागरिकाभिमुख सेवेत सातत्याने  होत असलेल्या सुधारणा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा नवीन लोगो विभागाच्या ओळखीला नवी  दिशा देणारा ठरेलअसे मत डॉअशोक कटारेयांनी व्यक्त केलेनवीन लोगोमुळे जिल्हा आरोग्य विभागाची  एक वेगळी ओळख निर्माण होउन यामुळे विभागाची कार्यसंस्कृतीदृष्टीकोन आणि जनतेशी असलेली बांधिलकी अधिक स्पष्टपणे दृश्यमान होईलया उपक्रमामुळे विभागाची प्रतिमा अधिक बळकट होईलअसा विश्वास विभागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉकिशोर भट्टाचार्य  यांनी  केले.

०००००००

No comments:

Post a Comment