Friday, 5 December 2025

वरोरा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी






 वरोरा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

Ø शेती विकासासाठी सूचना

चंद्रपूरदि. ०५  : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर  विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली. सदर जमीन डी-लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वन विभागास पाठविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावीअसे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी  मधुकर भलमे यांच्या तूर उत्पादन व बियाणे उत्पादन शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेलबिया उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंबप्रयोगशील शेती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहेअसे सांगून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी  संदीप भस्केतहसीलदार योगेश कौटकरपोलीस निरीक्षक श्री. तांबाडेउपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडेमुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा श्री. मेश्रामतालुका कृषी अधिकारी श्री. राठोडमहसूल मंडळ अधिकारी अजय निखाडे यांसह तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment