Thursday, 22 January 2026

मुख्य सचिवांकडून आनंदवनातील उपक्रमांचे कौतुक

 









मुख्य सचिवांकडून आनंदवनातील उपक्रमांचे कौतुक

Ø कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद

चंद्रपूरदि. 22 :  थोर समाजसेवी व पद्मश्री पुरस्कार प्राप्त बाबा आमटे यांनी आनंदवन (तावरोरायेथे स्थापन केलेल्या विविध उपक्रमांना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी (दि. 21)  भेट दिलीडॉविकास आमटे यांच्या नेतृत्वात महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांच्या सेवेसोबतच येथील प्रत्येक नागरिकांच्या हाताला काम व विविध प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसीत होत आहेहे अतिशय कौतुकास्पद असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल म्हणालेयावेळी त्यांनी कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणे संवाद साधला.

या भेटीदरम्यान नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरीजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेवरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्केउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायतमिना साळूंकेमहारोगी सेवा समितीच्या अंतर्गत व्यवस्थापन प्रमुख पल्लवी कौस्तुभ आमटेविश्वस्त सुधाकर कडूसदाशिव ताजणेजनसंपर्क अधिकारी राजेश ताजणे आदी उपस्थित होते.

संधीनिकेतन दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या फलकाचे अनावरण करून मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाअंधविद्यार्थीनी ऋतिका हिची आपुलकिने विचारपूस करतांनातुझे नाव कायकुठे राहतेकोणत्या वर्गात आहेतुला जेवणामध्ये व खेळामध्ये काय आवडते आदी बाबी जाणून घेतल्यातर अक्षरा गारघाटे या अंध विद्यार्थीनीने सादर केलेले तु बुध्दी दे….तु तेज दे….नवचेतना विश्वास दे…’ या गीताचे मुख्य सचिवांनी भरभरून कौतुक केले.

यावेळी त्यांनी ग्रंथालयसंगणक विभागशिवणकला विभागात विद्यार्थ्यांनी शिवलेले कपडेॲनी स्मार्ट क्लासइलेक्ट्रॉनिक विभागप्रशिक्षण कक्षप्रदर्शनी व विक्री केंद्रातील विविध कलाकृतीकाष्ठशिल्प युनीटवर्कशॉपहॅन्डलूम विभागसंगीत कला अकादमीरुग्णालय आदींची पाहणी केली व तेथील विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधलायावेळी त्यांनी संस्थेचे सचिव डॉविकास आमटे यांची भेट घेऊन चर्चा केली.

०००००००

No comments:

Post a Comment