Monday, 12 January 2026

सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण

  

सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 12 :  चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026  या कालावधीत जिल्हाधिकारी विनय गौडा    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेअभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद येथे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेतसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारीआरोग्य सेवक आरोग्य सेविकागटप्रवर्तक व आशा वर्कर यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मोहनीश गिरीनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉहेमचंद कन्नाकेजिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रकाश साठेसहाय्यक संचालक (कुष्ठरोगडॉ.संदीप गेडामजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललित पटले व जिल्ह्यातील सर्व  वैद्यकीय अधीक्षकतालुका आरोग्य अधिकारी,  जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुतेजिल्हा साथरोग अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्यजिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेश्वर उपस्थित होते.

 सिकलसेल मुक्त चंद्रपूर  जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी केलेजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे  यांनी सिकलसेल आजाराची पार्श्वभूमीतपासणी प्रक्रियारुग्ण व्यवस्थापन व अभियानाची अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अभियान दरम्यान 1) 15 ते 20 जानेवारी  सिकलसेल रुग्ण    सिकलसेल वाहक व्यक्तींची यादी करणे, 2) 21 ते 26 जानेवारी  0 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्तीची सिकलसेल तपासणी, 3) 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आवश्यकतेनुसार एचपीएलसी (इलेक्ट्रोफोरोसीसटेस्ट करण्यात येणार, 4) 4 ते 7 फेब्रुवारी  विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व समुपदेशन करण्यात येणार आहे.

सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियानाची प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी आरोग्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहचवणे तसेच सरपंचसिकलसेल अभियान आवाहन संदेशाचा व्हिडीओ तयार करून अभियानाबाबत जनजागृती करणेप्राथमिक व माध्यमिक शाळाआश्रम शाळा व महाविद्यालय येथे जनजागृती सत्र आयोजित करणेशाळेतील विद्यार्थ्यामार्फत प्रभात फेरी काढणेरांगोळी व निबंध स्पर्धाचे आयोजन करणेमहिला मंडळ व बचत गट सभा आयोजित करणेदवंडी व  मायकिंग करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment