Wednesday, 21 January 2026

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हास्तरावर कामकाज सुरू

 


महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हास्तरावर कामकाज सुरू

Ø पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 21 : इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत 13 उपकंपन्यांची स्थापना शासनाने केली आहे.

 यात लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळसोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणीवाणी समाज), स्वविष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारीआर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज), श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळसंत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज), आगरी समाज आर्थिक विकास महामंडळजगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत समाज), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज), संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज), महामंडळाचे जिल्हा स्तरावर चंद्रपूर येथे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावीमहामंडळामार्फत सहा योजना राबविल्या जात असून त्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजनाशैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनामहिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनाया पूर्णतऑनलाईन स्वरूपाच्या आहेतया योजनांसाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे. 20 टक्के बीज भांडवल योजना व थेट कर्ज (रु. 1 लक्ष पर्यंतयोजना या ऑफलाईन स्वरूपाच्या असून त्याचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळडॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनचंद्रपुरदूरध्वनी क्र. 07172-262420  या ठिकाणी संपर्क साधावाअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक केकेसातपुते यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment