Wednesday, 11 February 2026

13 फेब्रुवारी रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

13 फेब्रुवारी रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूरदि. 11 :  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांच्या वतीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रप्रशासकीय भवनहॉल क्र. 5  6 चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहेजिल्ह्यातील 10 वी, 12 वीआय.टी.आय., पदविकापदवीधर आदी शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांना विविध क्षेत्रातील उपलब्ध रोजगार संधींची माहिती व प्रत्यक्ष मुलाखतीची संधी मिळावीतसेच स्थानिक उद्योजक आणि नोकरी इच्छुक उमेदवार यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित व्हावाया उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 50 पेक्षा अधिक रिक्त पदे भरण्यात येणार असून विदर्भ क्लिक 1 सोल्युशनचंद्रपूर तसेच एस.बी.आयलाईफ इन्शुरन्सचंद्रपूर (फिल्ड वर्कया नामांकित कंपन्यांकडून तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहेइच्छुक उमेदवारांनी आधारकार्डशैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या प्रती तसेच किमान तीन प्रती रिझ्युमेसह उपस्थित राहावेअधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर येथे दूरध्वनी क्रमांक 07172-252295 वर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment