Thursday, 12 February 2026

16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन


16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूरदि.12 :  समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावीयासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर व चवथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतोफेब्रुवारी 2026 महिन्याचा तिसरा सोमवार दि. 16 रोजी  असल्याने या दिवशी दुपारी 1 वाजता निवासी उपजिल्हाधिकारीतथा अपर जिल्हादंडाधिकारीचंद्रपूर यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणीसमस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतीलअशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापुर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीचंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावेप्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल.  तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावाअसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी  भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment