Friday, 20 February 2026

22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

 22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

चंद्रपूरदि.20 :  वरोरा येथे स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवनसद्भावना चौक अभ्यंकर वार्ड येथे 22 फेब्रुवारी2026 रोजी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात येत आहे .त्यामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॅाल लागणार असून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सदर महाशिबीरात उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment