Friday, 27 February 2026

जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन


 जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालयपुणेच्या वतीने सन 2024-25 व 2025-26 या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवकयुवती व नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेतया पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वैयक्तिक स्वरुपात एक युवकएक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना प्रत्येकी 10 हजार रुपये रोखगौरवपत्र व सन्मानचिन्ह असे असून या पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय 13 ते 35 वयोगटातील असावेतसेच संस्था ह्या सार्वजिनक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यातसंस्थेकरिता पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोखगौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकयुवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून अथवा www.maharashtra.gov.in (संकेतांक २०१३१११२११२२०४३३२१या संकेतस्थळावरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेला विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावाआवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव 20 एप्रिल 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे सादर करावाअसे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment