Wednesday, 4 February 2026

आर-सेटीच्या वतीने स्वयंरोजगाराबाबत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

 आर-सेटीच्या वतीने स्वयंरोजगाराबाबत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

Ø युवक – युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,   दि. 04 : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी), चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर मार्गावरील जुने डी.एडकॉलेज जवळबाबूपेठ येथे ग्रामीण व शहरी भागातील युवक व युवतींसाठी 12 दिवसांचे मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहेसदर प्रशिक्षणाची सुरवात 14 फेब्रुवारी 2026 रोजी होईल.

या प्रशिक्षणात वेगवेगळ्या प्रकारचे केक बनविणेफास्ट फूडपेस्ट्रीकूकिस व मंचुरियन नूडल्समोमोजचायनीज प्रॉडक्टपाणीपुरीशेव पुरीचाटसमोसेकचोरीसांबरवडीशाबुदाणावडी व इतर ही प्रॉडक्ट शिकविण्यात येतीलयासोबतच आर-सेटी बँकबद्दलची माहितीविविध कर्जप्रकारा बद्दलची माहिती व इतरही माहिती देण्यात येईलप्रशिक्षण घेतल्यानतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना बँक ऑफ इंडिया आर-सेटी कडून प्रमाणपत्र देण्यात येतील.

प्रशिक्षण घेण्याऱ्याचे  वय 18 ते 50 असावेतसेच या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी व्यक्तींना सुद्धा प्राधान्य देण्यात येईलप्रशिक्षणासाठी उमेदवारांनी 11 ते वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचंद्रपूर येथील अनुप कासवटे (मो.नं 8421009602) आणि अक्षय लांजेकर (मो.नं. 9021913751)  यांच्याशी संपर्क करून आपले नाव नोंदनी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावाहे प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवास्यांसाठी आहेअसे बँक ऑफ इंडिया आर-सेटीचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment