Sunday, 1 March 2026

श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी



 श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी

लाखो भाविकांची अलोट गर्दी

बोले सो निहालसत श्री अकालच्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

 

नवी मुंबईदि. ०१ :  हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वाहे गुरु”  “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरू ग्रंथ साहिबजी यांचे पावन दर्शन घेतले जात आहे.

संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. अखंड कीर्तनगुरुवाणी आणि प्रार्थनेमुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते.

लंगर व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनस्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत सुरू आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माचे भाविक शांतताशिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

            भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली असून लाखो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. तसेच चहाअल्पोपहारज्यूस सह विविध माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

त्याग आणि मानवतेचा संदेश

श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या अद्वितीय त्यागधर्मनिष्ठा आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहिदी समागमातून करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून समाजात बंधुताएकता आणि सर्वधर्मसमभावाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.

00000

No comments:

Post a Comment