Friday, 6 March 2026

जिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 






जिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Ø तहसील कार्यालयचंद्रपूर येथे 6, 7 आणि 8 मार्च पर्यंत आयोजन

चंद्रपूरदि. 06 : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयचंद्रपूर येथे कल्याणकारी शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते आज (दि.6) करण्यात आलेयावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार विजय पवारसहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरेजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकरनायब तहसीलदार ओंकार ठाकरेराजू धांडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेजिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहेयोजनांची माहितीत्याचे निकषअटी  शर्ती आदी बाबी प्रदर्शनामध्ये लावण्यात आल्या आहेत. 7 मार्च पासून जिल्ह्यातील महसूली मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहेमहाराजस्व अभियानादरम्यान सर्व अधिकारी  कर्मचा-यांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना योजनांचा लाभ द्यावातसेच चंद्रपूर तहसील कार्यालय येथे आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

सुरवातीला फित कापून जिल्हाधिकारी श्रीगौडा यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केलेयावेळी त्यांनी डीजीटल चित्ररथाचे सुध्दा उद्घाटन केलेतहसील कार्यालय चंद्रपूर येथे 6, 7 आणि 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत छायाचित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

०००००००

No comments:

Post a Comment