Wednesday, 25 March 2026

जिल्हाधिका-यांकडून बँकर्स प्रतिनिधींचा आढावा

 जिल्हाधिका-यांकडून बँकर्स प्रतिनिधींचा आढावा

चंद्रपूर दि. 25 : डिसेंबर 2025 पर्यंत संपलेल्या तिमाहीत जिल्ह्यातील बँकांनी केलेल्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी आज (दि.25) घेतलाजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटेनाबार्डचे मुख्य व्यवस्थापक तृणाल फुलझेलेजिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक श्रीखरमाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारीबँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावर्षी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहेत्यामुळे बँकांनी जास्तीत जास्त शेतक-यांना पुढील हंगामासाठी कर्जवाटप करावेअशा सुचना जिल्हाधिकारी श्रीगौडा यांनी सर्व बँकांना दिलेतसेच मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेमध्ये खाजगी बँकांनी आपला सहभाग वाढवावाजिल्ह्यातील विविध वित्तीय महामंडळांकडून आलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढून त्यांना दिलासा द्यावाविनाकारण कर्ज प्रकरणे अडवून ठेवू नयेमत्स्यव्यवसाय करणा-या मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावेअशा सुचना जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीपोरकुटे यांनी डिसेंबर 2025 पर्यंतचा सर्व बँकांचा आढावाशासकीय योजनांची प्रगतीकर्जवाटपथकबाकी आदींबाबत सादरीकरण केले.

००००००

No comments:

Post a Comment