▼

Thursday, 12 March 2026

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त आदिवासी मेळावा उत्साहात




 

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त आदिवासी मेळावा उत्साहात

चंद्रपूर, दि. 12 : क्रांतिवीर बाबुराव  शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने गुरुवारी भव्य आदिवासी मेळावा, आरोग्य शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे जतन करत क्रांतिवीरांच्या गौरवशाली कार्याची आठवण जागवण्यात आली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता राजेंद्र खांडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.

व्यासपीठावर नगरसेविका सुशिला सिडाम, सरला कुळसंगे, नगरसेवक कुलमेथे, शहर ठाणेदार रामटेके, ॲड. संतोष कुळमेथे, मीनाताई आत्राम, महिपाल मडावी, प्रतिक कुळसंगे, अरुण मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात शेकडो नागरिकांची सिकलसेल तपासणी, मधुमेह, रक्तदाब तसेच दंत तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य व गीतांच्या सादरीकरणातून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास सांगत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीच्या अध्यक्षा शशिकला उईके, विलास मसराम, आदिवासी सेवक डी. के. आरिकर, अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा मसराम, जनार्दन गोडाम, भारत आत्राम, प्रेमदास मेश्राम, विजय कुमरे, मधुकर कोटनाके, प्रमोद कोडपे, प्रतिक कुलसंगे, शुभम मडावी यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

००००००

No comments:

Post a Comment