Monday, 13 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

 

डॉबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

चंद्रपूरदि. 13 : कौशल्य विकासरोजगार व नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेया स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहेस्पर्धा निबंध लेखन स्वरूपात असून निबंधाचा विषय "भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्यअसा आहे.

निबंध स्पर्धा ही मराठी भाषेत असून स्पर्धचे दोन गट ठेवण्यात आले आहेत.  गट मध्ये आयटी आय डिप्लोमा प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी /बायफोकल व एमसीव्हिसी विद्यार्थ्यांसाठी 500 ते 800 शब्द मर्यादा असेल व गट 2 मध्ये पुरुष/महिला खुला गटासाठी 800 ते 1200 शब्द मर्यादा असेल.

निबंध मूळ (सत्यप्रतअसावाकॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेलप्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर सुस्पष्ट आणि सुसंस्कृत असावा. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईलमात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहेनिबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध क्यूआर कोड स्कॅन करून खाली दिलेल्या लिंकवर अपलोड करावापूर्ण नावगट क्रमांकसंपर्क क्रमांक., आयटीआयशाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता ही माहिती स्पर्धकांनी भरावी.

निबंधाचे मूल्यांकन मांडणीभाषामौलिकतादृष्टिकोन आणि सर्जनशीलता या निकषांवर केले जाईलविजेत्यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस 31 हजार, द्वितीय 21 हजार व तृतीय 11 हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईलस्पर्धेचा निकाल अधिकृत माध्यमातून जाहीर करण्यात येईल. आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहीलअपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहीलसर्व स्पर्धकांनी आपला निबंध 14 ते 20 एप्रिल 2026 या निर्धारित वेळेत सादर करावा.

अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर या कार्यालयास संपर्क करावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment