▼

Monday, 6 April 2026

नागभीड भुमी अभिलेख कार्यालयातून नागरिकांना नियमितपणे सेवा


 नागभीड भुमी अभिलेख कार्यालयातून नागरिकांना नियमितपणे सेवा

चंद्रपूर, दि. 06 :  भुमी अभिलेख विभागाच्या बहुतेक सेवा जसे की ई- मोजणी, ई फेरफार, नक्कल अर्ज, मोजणी 'क' प्रत याबाबतच्या सेवा ऑनलाईन पध्दतीने पुरविल्या जातात. तसेच इतर कार्यालयीन सेवा देखील कार्यालयातील कर्मचा-यांकडून नियमितपणे दिल्या जात आहे. तसेच 3 डिसेंबर 2025 पासून उप अधीक्षक, भूमि अभिलेख, नागभीड हे पद नियमित भरलेले असल्यामुळे नागरिकांना सुरळीत सेवा मिळत असल्याचे नागभीड येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक वंदना नाईक यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment