Friday, 10 April 2026

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत




नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

चंद्रपूरदि. 10 : नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान राबविण्यात येत आहेया अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयचंद्रपूर तसेच भुमी अभिलेख विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 10) पडोली येथे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात त्या बोलत होत्यायावेळी मंचावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामजिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख प्रदीप जगतापप्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे यांच्यासह नामदेव डाहुलेगंगाधर वैद्यशेखर शेट्टी आदी उपस्थित होते.

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती पंत म्हणाल्याया शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व सेवा देण्यात येत आहेयात उत्पन्नाचे दाखलेशिधापत्रिका वाटपसनद वाटपसातबाराफेरफार आदी लाभांचा समावेश आहेनागरिकांना आता सरळसोप्या आणि ऑनलाईन पध्दतीनेसुध्दा लाभ घेण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहेयेथे शासकीय यंत्रणा उपस्थित आहेत्यामुळे प्रत्येकाने विविध शासकीय स्टॉलला भेट देऊन आपल्याला त्याचा लाभ कसा मिळेलयाची माहिती जाणून घ्यावीअसे आावाहन त्यांनी केले.

महसूल विभागाशी नागरिकांचा सर्वाधिक संबंध : आमदार किशोर जोरगेवार

महसूल विभाग हा नागरिकांशी सर्वाधिक संबंध येणारा विभाग आहेजनतेला एकाच ठिकाणी लाभ देण्यात येत असून यात सनद वाटपविविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहेराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल विभागाच्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहेअसे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून शासनाने वसुमना पंत यांची नियुक्ती केली असून पहिल्याच दिवसापासून त्या ॲक्शन मोडवर काम करीत आहेआरोग्यशिक्षणरोजगारवीजरस्तेपाणी या मुलभूत गरजांची जिल्हाधिकारी पंत यांच्या काळात प्रभावी अंमलबजावणी होईलतसेच जिल्हाधिका-यांनी महिलांसोबत संवादासाठी किमान एक तास राखीव ठेवावाअशी अपेक्षा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.

विविध प्रमाणपत्रांचे वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलेयात नरेंद्र जोगीबुध्ददास चांदेकरभारत निखाडेरामचंद्र निखाडेसुरेश घोरुडेउत्तम उपरेविवेक मेश्राम यांना सातबारा आणि फेरफार प्रमाणपत्रभुषण झाडेभगवान झाडेसंगिता अहीर यांना जिवंत सातबारा प्रमाणपत्र तर छोटूखन पठाणअशोक काळेधर्माजी खिल्लारेसाईनाथ गोसावीसुमन पिंगे यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

०००००००

No comments:

Post a Comment