Thursday, 9 April 2026

महिला कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी उजळणी प्रशिक्षण


महिला कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी उजळणी प्रशिक्षण

चंद्रपूरदि09 बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत 'कॅम्पा सन 2025-26योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 30 दिवसीय उजळणी प्रशिक्षणाचा समारोप मुल पार पडलासामूहिक उपयोगिता केंद्रातील महिला कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी आणि तांत्रिक ज्ञान वृद्धीसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक मनोज खैरनार आणि वन परिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपाल सौदागर लाटकर तसेच पर्यवेक्षक योगिता साठवणे यांची उपस्थिती होतीया 30 दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षक श्रीकांत बुरांडे यांनी महिलांना बांबू हस्तकलेतील आधुनिक तंत्रज्ञानडिझाइन आणि कौशल्य वृद्धीबाबत सखोल मार्गदर्शन केलेप्रशिक्षणादरम्यान महिलांनी बांबूपासून विविध नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले.

यावेळी महिला प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. या उजळणी प्रशिक्षणामुळे त्यांच्या कौशल्यात भर पडली असून भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या प्रशिक्षणाचा त्यांना मोठा फायदा होणार आहेअसे त्या म्हणाल्या. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रास्ताविकातून योगिता साठवणे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बांबू हस्तकलेचे महत्त्व विशद केलेकार्यक्रमाचे संचालन स्नेहल मोहुर्ले यांनी केले.

००००००

No comments:

Post a Comment