महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी अर्ज करा
चंद्रपूर, दि. 06 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षकांतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सन 2026-27 अंतर्गत प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली अर्ज करावा. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००

No comments:
Post a Comment