▼

Tuesday, 5 May 2026

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना


अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना

चंद्रपूर, दि. 05 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षांवरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्व:हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के  कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के  हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन  निर्णय www.maharashtra gov.in संकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment