उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 12 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात
चंद्रपूर, दि. 11 : राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे 12 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा उद्योग विभागाबाबत आढावा बैठक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या अनुषंगाने आढावा बैठक, तसेच खादी व ग्रामोद्योग बाबत आढावा बैठक, दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे उद्योजकांसमवेत संवाद, दुपारी 1 वाजता लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक, दुपारी 3 वाजता मराठी भाषा विभाग आढावा बैठक व साहित्यिकांसोबत संवाद, दुपारी 3 वाजता नियेाजन भवन येथे पत्रकार परिषद, दुपारी 4 वाजता आनंदवन आश्रम, वरोराकडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता आनंदवन आश्रम, वरोरा येथे भेट, सोयीनुसार आनंदवन येथून चंद्रपूरकडे प्रयाण आणि शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव.
००००००

No comments:
Post a Comment