रक्षाबंधनानिमित्त रेल डाक सेवा काउंटरवर बुकिंगची सुविधा
चंद्रपूर, दि. 07 : रक्षाबंधन सणानिमित राखी, भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगमध्ये होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांच्या सोयीसाठी चंद्रपुर रेल डाक सेवा सॉर्टिग काउंटर, मुख्य डाक घर बिल्डींग येथे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रक्षाबंधन सणानिमित्त राखीचे पार्सल वेळेवर रवाना आणि वितरित करता यावेत, यासाठी सदर काउंटर दुपारी 4 ते रात्री 8.30 या वेळेत सुरू राहील. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतरही आपली पार्सल सोयीस्करपणे बुक करता येतील. रात्री उशिरापर्यंत बुकिंगच्या काउंटरवर स्पीड पोस्ट,पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध असतील.
नागरिकंनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा आणि भारतभर तसेच परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी, भेटवस्तू, मिठाई आणि सणासुदीच्या इतर वस्तू वेळेवर पोहोचवण्यासाठी बुक कराव्यात. वितरण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर होण्यासाठी ग्राहकांनी वस्तूंचे योग्य पॅकिंग करावे, पूर्ण टपाल पत्ता व अचूक पिन कोड नमूद करावा आणि प्राप्तकर्त्याचा मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन रेल डाक सेवा विभागाचे अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment