▼

Thursday, 24 April 2025

आकर्षक वाहन क्रमांकासाठी करा अर्ज

 

आकर्षक वाहन क्रमांकासाठी करा अर्ज

चंद्रपूर, दि, 24 एप्रिल :  प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी MH-३४, CP-०००१ ते MH-३४, CP-९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.  ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात 28 एप्रिलच्या दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेले शासकीय शुल्काच्या रकमेचा भरणा करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत.

अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. तसेच सदर मालिका चालु असतांना वाहन 4.0 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नवीन मालिका 29 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येईल. प्राप्त होणारे अर्ज 28 एप्रिलपर्यंत  दुपारी 4 वाजेपर्यंत स्विकारले जातील व एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील.

एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत संबंधितांनी 28 एप्रिल रोजी 4 वाजता चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (DD) स्वतंत्र बंद लिफाफ्यातुन सादर करणे बंधकारक राहील. याच दिवशी सांयकाळी 4.30 वाजता वाढीव रकमेचे बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धानादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment