Monday, 9 June 2025

पालकमंत्र्यांकडून बिरसा मुंडा यांना अभिवादन



 

पालकमंत्र्यांकडून बिरसा मुंडा यांना अभिवादन

चंद्रपूरदि. 9 जून : शहीद दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी अभिवादन केलेयावेळी आमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंगजिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनउपसंचालक आनंद रेड्डीप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारसुभाष कासनगट्टूवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉउईके यांनी शहीद बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलेयावेळी ते म्हणालेभगवान बिरसा मुंडा हे 9 जून रोजी शहीद झालेत्यानिमित्त आज सर्व आदिवासी बांधवविविध सामाजिक संघटना तसेच शासकीय स्तरावर शहीद दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर ही बिरसा मुंडा यांची जयंती देशात जनजाती गौरव दिन म्हणून साजरी केली जातेसंपूर्ण आदिवासी समाजाचा हा गौरव आहेबिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्यानुसार आदिवासी समाजाने वाटचाल करावीअसेही त्यांनी सांगितले.

००००००

No comments:

Post a Comment