Search This Blog

Monday, 9 June 2025

पालकमंत्र्यांकडून बिरसा मुंडा यांना अभिवादन



 

पालकमंत्र्यांकडून बिरसा मुंडा यांना अभिवादन

चंद्रपूर, दि. 9 जून : शहीद दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपसंचालक आनंद रेड्डी, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सुभाष कासनगट्टूवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उईके यांनी शहीद बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले, भगवान बिरसा मुंडा हे 9 जून रोजी शहीद झाले. त्यानिमित्त आज सर्व आदिवासी बांधव, विविध सामाजिक संघटना तसेच शासकीय स्तरावर शहीद दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर ही बिरसा मुंडा यांची जयंती देशात जनजाती गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. संपूर्ण आदिवासी समाजाचा हा गौरव आहे. बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्यानुसार आदिवासी समाजाने वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले.

००००००

No comments:

Post a Comment