Search This Blog

Saturday, 28 February 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखविला झेंडा



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास दाखविला झेंडा

 

नाशिकदि. 27 : खारघरमुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च, 2026 रोजी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम निमित्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या बस व चित्ररथास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून ओझर विमानतळ येथून मार्गस्थ केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारजलसंपदा मंत्री गिरीश महाजनआमदार राहुल ढिकलेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामकुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहपोलीस आयुक्त संदीप कर्णिकनाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्माजिल्हाधिकारी आयुष प्रसादमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीपोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलमहानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायरसहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबेमाजी आमदार बाळासाहेब सानपक्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (बंजारा व लभाना समाज) रवींद्र गांगोले- नाईकक्षेत्रीय समिती सहअध्यक्ष (शीख समाज) गुरमीतसिंग संधूधर्म जागरण विभागजिल्हा समन्वयक संजय लढ्ढा आदी उपस्थित होते.

खारघरमुंबई येथे  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यकमास जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या 62 व 118 खासगी बसेसमधून भाविक जाणार आहेत. 

0000

हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन

 







हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या 
शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन

सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून

'बोले सो निहाल'च्या जयघोषाने दुमदुमले खारघर

 

            नवी मुंबईदि.27(विमाका) :  'हिंद-दी-चादरश्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकालचा गगनभेदी जयघोष आणि या सोहळ्यात संतभाविकलोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात भव्य 'नगर कीर्तनसोहळा पार पडला.

            या ऐतिहासिक नगर कीर्तनाला शुक्रवारी सायंकाळी 5.00 वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभासीबीडी बेलापूर येथून प्रारंभ झाला. यानंतर डी.वाय.पाटील चौक बेलापूरआरबीआय कॉलनी चौकबेलपाडा मेट्रोखारघर रेल्वे स्टेशन चौकउत्सव चौकग्राम विकास चौकगुरुद्वारा श्री गुरुसिंह सभाखारघर येथून समागम स्थळ ओवे खारघर येथे या नगर किर्तनाचा समारोप करण्यात आला. हे किर्तन केवळ एक शोभा यात्रा नाही तर गुरुसाहेबांच्या त्यागसहासधर्म रक्षा आणि मानवतेचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचा माध्यम आहे.

            सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.

            कलगीधर दशमेश पित्याच्या छत्र छायाखालीशब किर्तन आणि सेवेच्या सहवासात ही अलौकिक यात्रा आपल्या एकताबंधुभाव आणि अध्यात्मिक जागृतीकडे घेऊन जाणार आहेअसा विश्वास या नगर कीर्तनातून मिळाला. धार्मिक कीर्तनगुरु वाणीचे पठण आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विविध समाजघटकस्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी नगर कीर्तनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

             या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतकाप्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होतीतर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझीमनृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसालआणि 'हिंद दी चादरअसे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.

            या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहिदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईककोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदेपनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळेसहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळरायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोडकोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरानवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिध्दूखारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बलमहाराष्ट्र राज्य शीख समितीचे चरणदिप सिंह (हॅपी सिंग)हिंद दी चादर कार्यक्रमाचे नवी मुंबई सचिव सुखविंदर धिल्लन आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला.

            यावेळी शीखमोहयालबंजारासिकलीगरलबानासिंधीवाल्मिकीउदासीन तसेच भगत नामदेव संपद्राय या विविध समाज्याचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर भाविकांनी गुरुंच्या शहादतीचे स्मरण करत देशाच्या एकात्मतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला. संपूर्ण आयोजनात प्रशासनाने वाहतूकसुरक्षा आणि इतर सुविधांची योग्य व्यवस्था केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

     हा समागम पुढील दोन दिवस विविध धार्मिकसांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार असूनमोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत

 रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर खारघरवासियांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.

000000

श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन

  



श्री गुरू तेग बहादुर साहिब जी' यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे नवी मुंबईत आयोजन

शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सोयी-सुविधांसह सज्ज

- कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडणार

- राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक

      मुंबई दि. २७ : हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय  समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंहअल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले कीया दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असूनमुख्य मंडपात एकावेळी  ८० हजार ते १ लाख भाविक आसनस्थ होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  स्वतंत्र पार्किंग स्थळे ३८विशेष तीन हेलिपॅडची व्यवस्था२५ हजार भाविकांची निवास व्यवस्थातात्पुरती स्वच्छतागृहे १ हजार पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी ५०० पेक्षा अधिक उपलब्ध असणार आहेत.

            तसेच आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी ३०० पेक्षा अधिक असणार आहेत. तात्पुरती वैद्यकीय केंद्रे १५ पेक्षा अधिकतात्पुरते एक आयसीयू केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. राखीव खाटा (जवळील रुग्णालये)  ३५०तर नजीकच्या रूग्णालयात राखीव आयसीयू खाटा ७५उपलब्ध आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमात १० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

शहिदी समागमाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक

राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की,  'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभाग व शहिदी समागम राज्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथे भव्य शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिग सैनी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तामीळनाडू येथील भाजपा नेते अण्णामलाई, योग गुरु बाबा रामदेव, बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, दीदी मा साध्वो ऋतंभरा उपस्थित राहणार आहेत.

तसेच शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संप्रदाय या समाजातील संत आणि रागी जत्थेदार उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी नगर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शौर्य, धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि न्यायमूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाची संपुर्ण माहिती https://gurutegbahadurshahidi.com/home  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००

चोरगाव येथे १५ दिवसीय बांबू क्राफ्ट प्रशिक्षण शिबिराचा समारोप

 

चोरगाव येथे १५ दिवसीय बांबू क्राफ्ट प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Ø बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रचा उपक्रम 

Ø महिलांना रोजगाराची नवी दिशा

चंद्रपूरदि. 28 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत ‘कॅम्पा सन २०२५-२६’ मोहिमेअंतर्गत चोरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसीय विशेष बांबू प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप करण्यात आला. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना बांबू कलेचे आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चोरगाव येथील महिलांसाठी आयोजित ‘ट्रेनिंग कम प्रोडक्शन’ (प्रशिक्षण व उत्पादन) या संकल्पनेवर आधारित वर्गामध्ये महिलांना बांबूपासून आकर्षक प्रसाद बॉक्स तसेच कलात्मक बांबू ज्वेलरी (दागिने) तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या बांबूचा वापर करून बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तूंची निर्मिती कशी करावीयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वेलमे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार,   चोरगावच्या सरपंच तृणाली धंदरेवनपाल सचिन टेकामप्रशिक्षण केंद्राच्या पर्यवेक्षक योगिता साठवणे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना आकाश मल्लेलवार यांनी सांगितले कीबांबू हा केवळ नैसर्गिक स्रोत नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सक्षम इंजिन ठरू शकतो. महिलांनी या कलेचा उपयोग करून स्वतःचे लघुउद्योग सुरू करावेतजेणेकरून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यावेळी वेलमे मॅडम म्हणाल्या कीमहिलांना उत्पादनासाठी लागणारा बांबू विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाईल. तसेचज्या महिलांना पुढील प्रगत प्रशिक्षणासाठी  चिचपल्ली येथे यायचे आहेत्यांच्यासाठी वाहतुकीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या बांबू वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे चोरगाव परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून बांबू हस्तकलेला नवी चालना मिळणार आहे. सदर प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी केले. सहाय्यक म्हणून सुनिता मोकाशे तसेच प्रशिक्षक ‘बांबू सखी’ स्वाती रोशन जुमडे व मानसी भडके यांनी मोलाचे योगदान दिले.

००००००

Friday, 27 February 2026

1 मार्च रोजी आदिवासी तसेच वधु वर परिचय मेळाव्याच्या आयोजन

 1 मार्च रोजी आदिवासी तसेच वधु वर परिचय मेळाव्याच्या आयोजन

चंद्रपूरदि. २७ :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर यांच्या वतीने 1 मार्च 2026 रोजी आदिवासी मेळावावधू-वर परिचय मेळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम मूल येथील स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास मा. पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध आदिवासी संघटनाशासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिवासी महिला व पुरुष बचत गटांना विविध योजनांचे लाभ मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ट्रॅक्टर वाटपमालवाहू गाडी वाटपतसेच शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहांतील व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळावाविविध योजनांअंतर्गत साहित्य वितरण व मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात ५० आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह कार्यक्रम संपन्न होणार  आहे. सर्व आदिवासी बांधवांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

बांधकाम कामगारांची नोंदणी आणि सेवा नि:शुल्क


बांधकाम कामगारांची नोंदणी आणि सेवा नि:शुल्क

Ø कोणत्याही फसवेगिरीस बळी न पडण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 : कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत  इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणीनूतनीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातातनोंदणीनुतनीकरण  लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी  नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली  काढले जातातअर्ज मंजूर /नामंजूर असल्यास एसएमएस द्वारे कारणासह कामगारास कळविल्या जातेसदरच्या सेवा मंडळामार्फत निःशुल्क राबविण्यात येतात.

बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात देण्यात येतोयाकरीता कोणतेही शुल्क आकरण्यात येत नाहीही सर्व कामे ऑनलाईन असून ते कोणत्याही एजेंटदलालमध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाहीया ऑनलाईन कामाकरीता कोणीही पैशाची / कमिशनची लाचेची मागणी केल्यास मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावीअशा प्रकारच्या सुचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र  तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आलेल्या आहेत.

नोंदणीनुतनीकरण  लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर कामगारास त्याने निवडलेल्या तारखेस कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येतेलाभाच्या अर्जासंदर्भातील उपस्थित राहण्याबाबतच्या पत्रात देखील मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असूनकोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निःशुल्क क्रमांक 1064 अधवा दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेल achwebmail@mahapolic.gov.in वर तक्रार नोंदवावीत्यामुळे कामगारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नयेअसे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्र.भिकावळे यांनी केले आहे.

००००००

परावर्तक टेप जेम्स पोर्टलवरून खरेदी करण्याबाबत निविदा प्रसिध्द


परावर्तक टेप जेम्स पोर्टलवरून खरेदी करण्याबाबत निविदा प्रसिध्द

चंद्रपूरदि. 27 :  रस्ता सुरक्षा अभियान- 2026 अंतर्गत अपघात कमी करण्याच्या अनुषंगाने वाहनांवर परावर्तक टेप बसविण्याबाबत 24 फेब्रुवारी 2026 रोजी जेम्स पोर्टलवरून खरेदी करण्याबाबत निविदा प्रसिध्दी दिलेली असून अटी व शती Gem.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहेतअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे  यांनी कळविले आहे.

००००००