Search This Blog

Friday, 27 February 2026

आरसेटी मार्फत मोफत निवासी प्रशिक्षण

 

आरसेटी मार्फत मोफत निवासी प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 27 :  बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर रोड, जुने डी.एड. कॉलेज जवळ, बाबूपेठ, येथे ग्रामीण व शहरी विभागातील महिला पुरुष व युवक-युवतीसाठी शेळीपालन, कुकुटपालन, डेअरीफार्मिंग, कृषी उद्यमी अंतर्गत निवासी मोफत प्रशिक्षण 5 मार्च 2026 पासून सुरु करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण 13 दिवसांचे आहे.

या प्रशिक्षणात विविध कर्ज प्रकाराबद्दलची माहिती सोबतच इतरही माहिती देण्यात येईल. प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थीला बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेण्याऱ्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. तसेच या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी व्यक्तींनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल.

सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी 10 ते 5 वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील अनुप कासवटे मो.नं  8421009602  आणि अक्षय लांजेकर मो.नं 9021913751  यांच्याशी संपर्क करून नाव नोंदनी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. हे प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवास्यांसाठी आहे.

००००००

No comments:

Post a Comment