Search This Blog

Thursday, 18 December 2025

सावकारांकडून होणा-या छळाबद्दल करा तक्रार

 सावकारांकडून होणा-या छळाबद्दल करा तक्रार

Ø जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूरदि. 18 : महाराष्ट्र सावकारी (नियमनअधिनियम, 2014 नुसार सावकारी करण्यासाठी शासनाकडून वैध परवाना आवश्यक आहेपरवाना नसलेले सावकारांकडून जास्त व्याज आकारणेकर्जदारास धमकीमानसिक किंवा शारीरिक छळमालमता जप्तीबळजबरीने कागदांवर सही करून घेणे हे सर्व प्रकार बेकायदेशीर असून असा व्यवसाय करणारे सावकार हे शिक्षेस पात्र आहेतत्यामुळे आपण अशा छळास बळी पडत असाल तर घाबरू नकाकोणत्याही दबावाला बळी पडू नकाकोरे कागदधनादेश किंवा दस्तऐवजांवर स्वाक्षरी करू नकाजास्त व्याज व बेकायदेशीर वसुली मान्य करू नकायाबाबत त्वरीत तक्रार कराअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

येथे करा तक्रार : जिल्हा हेल्पलाईन क्र. 18002338691 वर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरसहाय्यक निबंधकसहकार विभागउप निबंधकसहकार विभाग,  जवळचे पोलिस ठाणे येथे आपण तक्रार दाखल करू शकतोआपली तक्रार गोपनीय ठेवण्यात येईलत्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीशेतमजुरआदिवासी बांधवमहिलाज्येष्ठ नागरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी वरील ठिकाणी तक्रार नोंदवावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 163 लागू


महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 163 लागू

Ø जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश

चंद्रपूर,दि. 18 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करून आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू केली आहे.  निवडणूक प्रक्रिया शांतनिर्भयमुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये व सदर आचार संहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने उपायोजना करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागु असलेली आदर्श आचारसंहिता अंमलात असेपर्यंतचे कलम 163 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी खालील बाबींवर निर्बंध लागु केले आहेयात 1. शासकीय कार्यालये/विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यासघोषणा देणे/सभा घेणे इत्यादीवर निर्बंध, 2. शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध, 3. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी ताफ्यामध्ये पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मिटर परिसरात व दालनात व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध, 4. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणेआयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध, 5.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे 200 मीपरिसरात धरणे आंदोलनमोर्चानिदर्शनेउपोषणे करण्यावर निर्बंध, 6. धार्मिक स्थळेरुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचा प्रचार कार्यालयासाठी वापर करता येणार नाही तसेच सदर ठिकाणापासून जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध, 7. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जात/धर्म/भाषावार शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध, 

8. निवडणुकीचे प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलकझेंडे लावणे इत्यादी बार्बीवर निर्बंध. 9. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खाजगी व्यक्तींच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडेभित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय लावण्यास निर्बंध, 10. निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार/रॅली/रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात 10 पेक्षा अधिक ( यामध्ये जास्तीत जास्त वाहने चारचाकी अथवा तीनचाकी व इतर वाहने दुचाकी असू शकतातमोटार गाडया/वाहने वापरण्यास निर्बंध, 11. मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर कुठल्याही माध्यमाव्दारे प्रत्यक्षरित्या अथवा सोशल मिडीयाव्दारे प्रचार करण्यास बंदी राहील. 12. कोणताही पक्ष अथवा उमेदवारवेगवेगळ्या जातीधर्मभाषा अथवा सामाजिक गट यांच्यामध्ये मतभेद होणारी किंवा ज्यामुळेत्यांच्यात परस्परांमध्ये द्वेश किंवा तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्यावर बंदी राहील. 13. जातधर्मजमात किंवा भाषा यांच्या आधारे आचारसंहिता कालावधीमध्ये अधिवेशन घेता येणार नाही, 14. निवडणूक प्रचार कालावधीमध्ये प्राण्यांचा तसेच 14 वर्षांखालील मुलांचा प्रचारासाठी वापर करण्यास बंदी राहील.

सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे.

०००००००

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन

 

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन

Ø अनेक नामवंत संशोधकांचा सहभाग

चंद्रपूरदि. 18 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसीचिचपल्ली या संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तसेच राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेसंशोधन परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीवएमएसरेड्डीअतिरिक्त विभागीय आयुक्त डॉमाधवी खोडेअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात एमएसरेड्डी यांनी बांबूला ग्रीन गोल्ड असे संबोधून हवामान बदलहरित विकासरोजगारनिर्मिती तसेच शाश्वत अर्थव्यवस्था उभारणीमध्ये बांबूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केलेबांबू आधारित उद्योगांच्या वाढीसाठी शासन विभागसंशोधन संस्था व उद्योग यांच्यातील समन्वय आणि सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉमाधवी खोडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र बांबू औद्योगिक धोरण 2025 चा संदर्भ देत बांबू हा उपजीविका निर्मितीग्रामीण विकास व हरित उद्योगांसाठी एक महत्त्वाचा स्रोत असल्याचे स्पष्ट केलेधोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बीआरटीसीने संशोधननवोन्मेषप्रोटोटायपिंगकौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावावीअसे त्यांनी सांगितलेयाच अनुषंगाने डॉखोडे यांनी नागपूर विद्यापीठ व बीआरटीसी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून शैक्षणिक सहकार्यसंयुक्त संशोधनइंटर्नशिप तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमुळे बांबू तंत्रज्ञान व उद्योजकतेला चालना मिळेलअसे प्रतिपादन केले.

तांत्रिक सत्रांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील संशोधक व तज्ज्ञांनी बांबू हस्तकलेतील मूल्यवर्धनआवश्यक तेलांपासून बांबू संरक्षकांची निर्मितीकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आधारित स्मार्ट बांबू लागवडबांबू कोळशावर आधारित ऊर्जा निर्मितीबांबू व इतर बांधकाम साहित्यांचे जीवनचक्र मूल्यांकनबांबू प्रजातींचे औषधी गुणधर्म तसेच पर्यावरणपूरक बांबू संरक्षण तंत्रे अशा विविध विषयांवर संशोधन सादरीकरणे केली.

या परिसंवादास लालसिंग (वरिष्ठ शास्त्रज्ञनीरीनागपूर), डॉप्रकाश इटनकर (नागपूर विद्यापीठ), डॉकेटीव्हीरेड्डी (डीनदत्ता मेघे वैद्यकीय संस्था), डॉएनगुप्ता (जेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटनागपूर), दिनेश लाकडे (स्ट्रक्चरल तज्ज्ञवर्धा), प्राप्रमोद महाले (डीएमआयएचईआर विद्यापीठ), एमगिरी वर्धा चे दीप वर्माडॉप्रशांत तायडेडॉसंदीप जोशीडॉविजय इलोरकरआर्किटेक्ट आशिष नागपूरकर (व्हीएनआयटीनागपूर), निधी गांधी (फॅशन डिझायनर), डॉमोनिकुंतला दास (आयआयटीगुवाहाटीतसेच डॉतारिका दगडकर (एसएमएमसीएनागपूरयांच्यासह अनेक मान्यवर तज्ज्ञ व संशोधक उपस्थित होते. 

बीआरटीसीचे संचालक मनोजकुमार खैरनार यांनी प्रास्ताविकातूनबीआरटीसी केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या संशोधन उपक्रमांचीप्रशिक्षण कार्यक्रमांचीऔद्योगिक सहकार्याची तसेच बांबू क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या दृष्टिकोनाची सविस्तर माहिती सादर केलीसंचालन स्नेहा मांडकेर यांनी केले तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी एडीमल्लेलवार यांनी मानले.

००००००

Wednesday, 17 December 2025

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’


 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

त्या’ पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

चंद्रपूरदि. 16 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहेत्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावी व त्यानंतरच पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावीसदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने करावयाची आहे.

या योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या Web Portal वरील e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या Web Portal वर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेतत्यानुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या Web Portal वर भेट देवून e-KYC प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने अंतिम (पूर्णकरण्यात यावी.

सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पुर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतीलतर अशा लाभार्थ्यांना पुनःश्च योजनेच्या Web Portal वर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी (One Time Edit Option) 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहेतथापिही संधी शेवटची असणार आहेत्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावीजिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्वरीत प्रक्रीया पूर्ण करावीअसे आावाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

००००००

राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा


राज्यांतर्गत अन्नधान्य कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा

चंद्रपूरदि. 17 :   राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येतेअशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेलतसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

रब्बी हंगाम 2025 मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुकाजिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेतत्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारीगहूहरभराकरडई व जवस या पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

पात्रता : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहेस्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईलपिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-),ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उताराजात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास),  पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यकबैंक खाते चेकपासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख :  रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील.  ज्वारीगहूहरभराकरडई व जवस पिकासाठी 31 डिसेंबर 2025. तालुकास्तरजिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये

बक्षिस स्वरूप :  तालुका पातळीवर प्रथम बक्षीस 5 हजारद्वितीय 3 हजार आणि तृतीय 2 हजार रुपयेजिल्हा पातळीवर प्रथम बक्षीस 10 हजारद्वितीय 7 हजार आणि तृतीय 5 हजार रुपयेराज्य पातळीवर प्रथम बक्षीस 50 हजारद्वितीय 40 हजार आणि तृतीय 30 हजार रुपये.

उपरोक्त नमूद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावेअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेपिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावातसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

००००००

Tuesday, 16 December 2025

जिल्ह्यातील सहा पीएचसींना ‘राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र’ जाहीर


जिल्ह्यातील सहा पीएचसींना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र’ जाहीर

चंद्रपूरदि. 16 : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात चंद्रपूर जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहेजिल्ह्यातील पाच तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जाणारा 'राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक' (NQAS) हा अत्यंत मानाचा बहुमान पटकावला आहे.

बाह्य परीक्षकांनी केलेल्या कडक मूल्यमापनात राजोली (तामुलप्राथमिक आरोग्य केंद्राने 88.55 टक्के गुणनेरी (ताचिमूरप्रा..केंद्राने 88.99 टक्के गुणवाढोणा (तानागभीडप्रा..केंद्राने 87.38 टक्के गुण,  बाळापुर (तानागभीड)  प्रा.केंद्राने 89.84 टक्के गुणमोहाडी नलेश्वर (तासिंदेवाहीप्रा..केंद्राने 92.92 टक्के गुण व कळमना (ताबल्लारपूरप्राथमिक आरोग्य केंद्राने 93.51 टक्के गुण मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

असे झाले 'क्वालिटीऑडिट : नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे,  केंद्रीय पथकाद्वारे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आलेयामध्ये दवाखान्याची स्वच्छताऔषधांची उपलब्धतारुग्णांना मिळणारी वागणूकगुणवत्ता पूर्ण सेवाप्रसूती कक्षातील सोयीप्रयोगशाळेतील अचूकता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे कर्मचाऱ्यांचे कौशल्यजंतुसंसर्ग नियंत्रणमागील वर्षभरात किती रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला व लाभार्थ्यांचे अभिप्राय अशा सर्व निकषानुसार या संस्थेचे मूल्यमापन करण्यात आले.

गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी पुढील 'ॲक्शन प्लॅन' : केवळ प्रमाणपत्र मिळवणे हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट नसून ही गुणवत्ता निरंतर टिकवून ठेवण्यासाठी खालील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहेयात 1) मूल्यमापन अहवालात सुचवलेल्या किरकोळ त्रुटी दूर करून 100 टक्के उद्दिष्टाकडे वाटचाल करणे. 2) रुग्णांना अधिक आपुलकीची आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेणे. 3) स्थानिक स्तरावर गुणवत्ता नियंत्रण समिती स्थापन करून दरमहा आरोग्य सेवांचा आढावा, 4) रुग्णांच्या सूचना आणि तक्रारींसाठी विशेष यंत्रणा राबवून त्याद्वारे सेवेचा दर्जा अधिक सुधारण्यावर भर राहणार आहे.

आरोग्य संस्थाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे

प्रमाणपत्र हा केवळ कागदोपत्री सन्मान नसून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या उत्तम आरोग्याचा पुरावा आहेआमच्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमाचे हे फळ आहेजिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या विशेष नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्यामुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहेजिल्ह्यातील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून या प्रमाणपत्रामुळे आता केंद्राकडून विशेष प्रोत्साहनपर निधी मिळणार व त्यातून आरोग्य सेवांचा चेहरामोहरा  बदलणार आहेअसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी सांगितले.

००००००

विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप






विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप

Ø मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम

चंद्रपूरदि. 16 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकूल येथे सोमवारी पार पडला.   

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा उदघाटक म्हणून अपर आयुक्त आयुषी  सिंहतसेच विशेष अतिथी म्हणून सहआयुक्त दिगांबर चव्हाणश्रीसोनकवडेगडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजीत सिंगअमर राऊत उमेश काशीद (प्रकल्प अधिकारी देवरी), नितीन इसोकर (प्रकल्प अधिकारी नागपूर), आंबेडकर महादियालयाचे  प्राचार्य डॉदहेगावकरचंद्रपूर आणि चिमूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवाररोशनी चव्हाणडॉसायली चिखलीकर आादी उपस्थित होते.

या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागातील अधिकारीकर्मचारीप्रकल्प कार्यालयेशासकीय आश्रमशाळाचे मुख्याध्यापकशाळांचे प्रतिनिधी शिक्षकजवळपास 3500 विदयार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेसदर स्पर्धांमध्ये कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅन्डाबालॲथलेटिक्स (धावणेचालणेलांब उडीउंच उडीगोळाफेकथाळीफेक, ) आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होताविभागीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना व संघभावनेला चालना मिळालीतर विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीनाविन्यपूर्ण संकल्पना व सर्जनशीलतेचे दर्शन घडले.

यावेळी अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी  शासकीय आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केलेआदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांमध्ये  समन्वयसंघभावना व कार्यक्षमता वाढविण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरताततसेच विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यामातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक  दृष्टीकोण जागृत होण्यास मदत होईलअसेही मत त्यांनी व्यक्त केलेतसेच उत्तमनियोजनबध्द सर्व स्पर्धांचे आयोजन केल्याबददल प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांचे विशेष कौतुक व सत्कार केला.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल सहभागी सर्व प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व चिमूर येथील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व समितीतील प्रमुखउपप्रमुखसर्व सदस्यसर्व मुख्याध्यापकक्रीडा समन्वयक तसेच संघ व्यवस्थापक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतोआपल्या सर्वांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळेसमन्वयामुळे व अथक परिश्रमामुळे सदर स्पर्धा अत्यंत शिस्तबद्धउत्साही व यशस्वीरीत्या संपन्न झाल्याखेळाडूंना प्रोत्साहन देणेस्पर्धांचे सुरळीत आयोजन करणे व आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी आपण दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे.

समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केलेसंचालन सपना पिंपळकर आणि उमेश कडू यांनी तर आभार राजीव बोंगिरवार यांनी  मानले.

बक्षिस वितरण : विज्ञान प्रदर्शनी निकाल

प्राथमिक गटात प्रथम क्रमांक अर्चना कांदो (अनुआश्रम शाळा गुंडापल्लीहिच्या इंधन वाचवणारी चुल या प्रयोगालाद्वितीय क्रमांक सोनाक्षी व संध्या यांच्या लेजर लेंस मायक्रोस्कोपमाध्यमिक गटात प्रथम क्रमांक

स्वाती रामू घरातद्वितीय क्रमांक सुमित प्रमोद आलामच्या अन्न कचरा व्यवस्थापनउच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पल्लवी इष्टाम व वेदिका येरकाडे यांच्या ऑटोमॅटीक कार्बन डायऑक्साईड अणि युव्ही वाटर फिल्टर या प्रयोगालाद्वितीय क्रमांक निकीता प्रसादी काटेंगे यांना मिळाला.

सांस्कृतिक कार्यक्रम निकाल : प्रथम क्रमांक थीम डान्स बेला रुपेलाद्वितीय क्रमांक जंगोम लढाई डान्स

प्लेअर ऑफ टुर्नामेंट : 19 वर्षाखालील मुले – अनिल दुलस्सा वडे, 19 वर्षाखालील मुली – रोशनी राजु पुंगाटी भामरागड, 17 वर्षाखालील मुले – सुरज विजय दुर्वाभामरागड, 17 वर्षाखालील मुली – अल्का रामदास मरस्कोल्हेदेवरी, 14 वर्षाखालील मूले गणेश लालसु मटटामीभामरागड, 14 वर्षाखालील मूली -  दिक्षा वसंत सडमेकअहेरी.            या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट रेंजर सायकल भेट देण्यात आली.

अंतिम निकाल : सर्व वैयक्तिक ॲथलेटिक्स (धावणेचालणेलांब उडीउंच उडीगोळाफेकथाळीफेकव सांघिक कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅन्डाबाल सामने मिळूनसर्वसाधारण विजेता – प्रकल्प भामरागड – प्राप्त गुण 489, सर्वसाधारण उपविजेता – प्रकल्प देवरी – प्राप्त गुण 249, तृतीय विजेता – प्रकल्प गडचिरोली - प्राप्त गुण 223. विजयी  विदयार्थ्यांना शिल्डप्रशस्तीपत्रसायकल तथा सन्माचिन्ह देवून गौरवण्यिात आले.

०००००००

दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सचिवांची भेट


दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सचिवांची भेट

चंद्रपूरदि. 16 : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रवेंदिरन यांनी भेट दिलीया भेटीदरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छतावैद्यकीय सुविधारुग्णसेवाऔषधसाठामनुष्यबळ तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची पाहणी केली.

यावेळी सचिवांनी आरोग्य केंद्रातील ओपीडीप्रसूती कक्षलसीकरण विभागप्रयोगशाळा आयुष्यमान कार्डआभा कार्ड तसेच स्वच्छता व पायाभूत सुविधांचा आढावा घेतलारुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व वेळेत मिळाव्यातयासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यातसेचग्रामीण भागातील नागरिकांना सुलभदर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा मिळाव्यातयावर त्यांनी विशेष भर दिलाआरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या भेटीप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेतालुका आरोग्य अधिकारी डॉकोमल मुनेश्वरवैद्यकीय अधिकारी डॉअमित जैस्वालडॉमाधुरी मेश्राम यांच्यासह आरोग्य कर्मचारीसंबंधित अधिकारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

००००००

निर्लेखित वाहनांच्या विक्रीकरीता 23 डिसेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

 

निर्लेखित वाहनांच्या विक्रीकरीता 23 डिसेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

चंद्रपूरदि. 16 : निर्लेखित शासकीय वाहनांची विक्री ज्या स्थितीत व जेथे आहे त्या स्थितीत करण्यासाठी इच्छुक खरेदी दारांकडून 23 डिसेंबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहे.

इन्होव्हा डी व्ही वाहन (क्र. MH३४-९९००ची उपप्रादेशिक परिवहनन अधिकारी यांनी ठरवून दिलेली बाजारमुल्य किंमत रुपये 3 लक्ष 50 हजार रुपये आहेसदर वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभे आहे.

निविदा फार्मची हजार रुपये असून ते सहाय्यक जिल्हा नाझरजिल्हा कार्यालयचंद्रपूर यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 23 डिसेंबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त करता येईललिलावातील अटी व शर्ती बाबत उल्लेख  निविदा फार्म मध्ये राहीलत्याच्या अधिन राहून निविदा स्विकारल्या जातीलप्राप्त निविदा 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता उपस्थितांसमोर उघडण्यात येतील.

वरील शासकीय वाहनांचे बाबतीत पुरेशा निविदा प्राप्त न झाल्यास शासकीय वाहनाची विक्री बाबत खुली बोली बोलून लिलाव त्याच दिवशी करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी डीएसकुंभार यांनी कळविले आहे.

००००००

वन अकादमी आणि नागपूर आयआयएम यांच्यात सहकार्यासाठी करार


वन अकादमी आणि नागपूर आयआयएम यांच्यात सहकार्यासाठी करार

चंद्रपूरदि. 16 :   वन प्रशासन व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील प्रशिक्षण क्षमता व संशोधन बळकट करण्याच्या दिशेने चंद्रपूर वन अकादमी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएमनागपूर यांच्यात सामंजस्य करार नुकताच करण्यात आलाहा करार वन अकादमीचे संचालक एमएसरेड्डी आणि नागपूर आयआयएमचे संचालक डॉभीमराव मेत्री यांच्या स्वाक्षरीने झालाया कार्यक्रमाला प्राअनूप कुमारअधिष्ठाता (शिक्षण कार्यक्रमआलोक कुमार सिंहवन अकादमीचे अतिरिक्त संचालक उमेश वर्मा आदी उपस्थित होते.

चंद्रपूर वन अकादमी ही महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत स्वायत्त संस्था असून वन अधिकाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहेपर्यावरणनैसर्गिक संसाधन व्यवस्थापनवन्यजीवहवामान बदल आणि संबंधित क्षेत्रातील शिक्षणप्रशिक्षण व संशोधन या महत्त्वाच्या कार्यात ही संस्था सक्रिय आहेयाप्रसंगी बोलताना एमएसरेड्डी म्हणालेया करारामुळे नैसर्गिक संपदा व्यवस्थापनसरकारी कर्मचाऱ्यांचे कौशल्य नकाशांक,  धोरणात्मक नेतृत्वप्रभावी संवादकलाटीम बिल्डिंगशाश्वत विकासपर्यावरणीय व सामाजिक शासन तसेच वन प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व संशोधन उपक्रम विकसित करण्यास मदत होईलहे उपक्रम वन अधिकाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कराराचा उद्देश आयआयएम नागपूरच्या व्यवस्थापन व नेतृत्वक्षेत्रातील तज्ज्ञता आणि चंद्रपूर वन अकादमीचा क्षेत्राधारित अनुभव यांना एकत्र आणून अभिनव प्रशिक्षण पद्धती आणि प्रभावी धोरण संशोधन पुढे नेण्याचा आहेया करारामुळे वन क्षेत्रातील भावी नेतृत्व घडविणे आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाला बळकटी मिळण्यास मदत होणार आहेअसे अपर संचालक (प्रशिक्षणउमेश वर्मा यांनी कळविले आहे.

००००००

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या एका पदासाठी अर्ज आमंत्रित

 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या एका पदासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 16 : सामान्य प्रशासन विभागाच्या 17 डिसेंबर 2016 अन्वये शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत शासन निर्णयात नमुद आहेत्याअनुषंगाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडील पोलिस दक्षता पथकाकडे प्रलंबित असलेल्या व उमेदवारांकडून समिती कार्यालयास नव्याने प्राप्त हेणाऱ्या प्रकरणात सखोली चौकशी करणे तसेच महसुलीशासकीय व इतर शैक्षणिक दस्ताऐवजांची पडताळणी झाल्यानंतर विहीत कालमर्यादित अहवाल समितीला सादर करण्यासाठी 11 महिन्याकरिता करार पध्दतीने सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या एका पदाची नियुक्ती करावयाची आहे.

तरी इच्छूक उमेदवारांनी 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीविद्या विहार शाळेच्या मागेडॉपीपिल्लई आयटीआयकॉलेज च्या वरदुसरा माळाछत्रपती नगरतुकूमचंद्रपूर येथे उपस्थित राहावेअसे सह आयुक्त रामचंद्र सोनकवडे यांनी कळविले आहे.

००००००

सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज भरण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


 सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज भरण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि. 16 : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-एकूण 72 पदाकरीता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिक व युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेतवरील पदापैकी पदे हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

सदर भरती प्रक्रिया टिसीएस आयओएन यांच्यामार्फत होणार आहेपरीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतीलइतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीतपात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (Resources Tab ----- Recruitment Tab येथे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहीलत्यानंतर सदर वेबलिंक बंद होईलअसे सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

Monday, 15 December 2025

प्रधान सचिव विजय वाघमारे यांची आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस भेट







प्रधान सचिव विजय वाघमारे यांची आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस भेट 

स्पर्धेदरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

चंद्रपूरदि. 15 : आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दि. 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर यांच्या वतीने आयोजित आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धांचा सविस्तर आढावा घेत खेळाडू विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 प्रधान सचिवांनी विभागीय विज्ञान प्रदर्शनीस भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांची पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. तसेच क्रीडा स्पर्धेदरम्यान उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्षास भेट देऊन वैद्यकीय सुविधा व खेळाडू विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक काळजीबाबत माहिती घेतली. यानंतर समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनीस भेट देत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे व सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले.

यावेळी विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना खेळशिक्षण व आरोग्य यांचा समतोल राखण्याचा सल्ला देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडाविज्ञान व कौशल्य विकासाला चालना मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत

14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणेख्यातनाम झाडीपट्टी नाट्यकलावंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून नगरपालिका प्रशासन अधिकारी विद्या गायकवाडकलावंत तथा गायक अनिरुद्ध वनकरप्रकल्प अधिकारी विकास राचेलवार,  दीपक हेडाऊ (भंडारा),  उमेश काशीद (देवरी) व उषा विकास राचेलवार उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागातील एकूण 9 प्रकल्पांतील विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत आदिवासी संस्कृतीवर आधारित पारंपरिक नृत्यगीतवेशभूषा व लोककलेचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रभावी सादरीकरण करण्याची संधी मिळाली.

पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कीया क्रीडा स्पर्धा केवळ शारीरिक क्षमतेचे नव्हे तर एकात्मताशिस्तसंघभावना व सांस्कृतिक जाणीवेचे प्रतिबिंब आहेत. खेळ व कला यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा समतोल विकास होतो. डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून अभ्यासात प्रगती करावी व उच्च पदांवर पोहोचावेअशी अपेक्षा व्यक्त केली.

खेळाडूंची दमदार कामगिरी

या स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी ॲथलेटिक्स (धावणेचालणेलांब उडीउंच उडीगोळाफेकथाळीफेक) तसेच कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅन्डबॉल या सांघिक खेळांत उत्कृष्ट कौशल्य सादर करत आहेत. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडविण्याचे प्रयत्न आदिवासी विकास विभागामार्फत सुरू आहेत.

०००००००