Search This Blog

Tuesday, 16 December 2025

सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज भरण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


 सैनिक कल्याण विभागाच्या लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज भरण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि. 16 : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-एकूण 72 पदाकरीता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिक व युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेतवरील पदापैकी पदे हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

सदर भरती प्रक्रिया टिसीएस आयओएन यांच्यामार्फत होणार आहेपरीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतीलइतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीतपात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (Resources Tab ----- Recruitment Tab येथे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहीलत्यानंतर सदर वेबलिंक बंद होईलअसे सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment