Search This Blog

Tuesday, 9 December 2025

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे चंद्रपूरमध्ये भव्य आयोजन

 


आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे चंद्रपूरमध्ये भव्य आयोजन

चंद्रपूरदि. 09 : आदिवासी विकास विभागनागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. अपर आयुक्त (आदिवासी विकास) आयुषी  सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या स्पर्धेत नागपूर विभागातील एकूण ९ प्रकल्पांतील सुमारे ३५०० विद्यार्थी सहभागी होणार असून कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅण्डबॉल या सांघिक स्पर्धांसोबतच 100 मी.200 मी.400 मी.1000 मी.5000 मीटर धावण्याच्या शर्यतीरिलेसह गोळाफेकथाळीफेकलांब उडीउंच उडी अशा विविध ॲथलेटिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पातील खेल समन्वयकशिक्षक व संघ व्यवस्थापकांसह सुमारे 300 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

तिन्ही दिवसांच्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था केली असून विविध ठिकाणी प्रकल्पनिहाय निवास केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक स्थळी आवश्यक कर्मचारी नियुक्त करून शिस्तबद्ध व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे.

प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या विभागीय प्रदर्शनीत आपापल्या प्रतिकृती सादर कराव्यातयासाठी विशेष मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व नवकल्पनाशीलता वाढावी या उद्देशाने पहिल्यांदाच विभागीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.

संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे नियोजन विकास राचेलवारप्रकल्प अधिकारीचंद्रपूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून त्यांच्या उपक्रमशील कार्यपद्धतीमुळे प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांना नेहमीच गती मिळत आली आहे.

सहभागी प्रकल्प

नागपूरचंद्रपूरवर्धागडचिरोलीभामरागडअहेरीदेवरीभंडारा व चिमूर — असे एकूण ९ प्रकल्प या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर येथे विभागीय क्रीडा स्पर्धा व प्रथमच विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन होत असून नागपूर विभागातील ३५०० विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. क्रीडाॲथलेटिक्स आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांत विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही उत्कृष्ट संधी आहे. विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्यांच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहन मिळेल.

चंद्रपूर येथील नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावेअसा मनापासून आग्रह आहे. — विकास राचेलवारप्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर.

०००००००

No comments:

Post a Comment