Search This Blog

Tuesday, 16 December 2025

दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सचिवांची भेट


दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला सचिवांची भेट

चंद्रपूरदि. 16 : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई.रवेंदिरन यांनी भेट दिलीया भेटीदरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छतावैद्यकीय सुविधारुग्णसेवाऔषधसाठामनुष्यबळ तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची पाहणी केली.

यावेळी सचिवांनी आरोग्य केंद्रातील ओपीडीप्रसूती कक्षलसीकरण विभागप्रयोगशाळा आयुष्यमान कार्डआभा कार्ड तसेच स्वच्छता व पायाभूत सुविधांचा आढावा घेतलारुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व वेळेत मिळाव्यातयासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यातसेचग्रामीण भागातील नागरिकांना सुलभदर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा मिळाव्यातयावर त्यांनी विशेष भर दिलाआरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या भेटीप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेतालुका आरोग्य अधिकारी डॉकोमल मुनेश्वरवैद्यकीय अधिकारी डॉअमित जैस्वालडॉमाधुरी मेश्राम यांच्यासह आरोग्य कर्मचारीसंबंधित अधिकारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment