अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या एका पदासाठी अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 16 : सामान्य प्रशासन विभागाच्या 17 डिसेंबर 2016 अन्वये शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत शासन निर्णयात नमुद आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडील पोलिस दक्षता पथकाकडे प्रलंबित असलेल्या व उमेदवारांकडून समिती कार्यालयास नव्याने प्राप्त हेणाऱ्या प्रकरणात सखोली चौकशी करणे तसेच महसुली, शासकीय व इतर शैक्षणिक दस्ताऐवजांची पडताळणी झाल्यानंतर विहीत कालमर्यादित अहवाल समितीला सादर करण्यासाठी 11 महिन्याकरिता करार पध्दतीने सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या एका पदाची नियुक्ती करावयाची आहे.
तरी इच्छूक उमेदवारांनी 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, विद्या विहार शाळेच्या मागे, डॉ. ए. पी. पिल्लई आय. टी. आय. कॉलेज च्या वर, दुसरा माळा, छत्रपती नगर, तुकूम, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, असे सह आयुक्त रामचंद्र सोनकवडे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment