Search This Blog

Saturday, 13 December 2025

आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन








आदिवासी विकास विभागाच्या

विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन

 

चंद्रपूरदि. 13 : आदिवासी विकास विभागनागपूर यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा–2025 व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथे  पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,  अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीचे सहाय्यक आयुक्त रामचंद्र सोनकवडेआदिवासी विकास विभाग नागपूरचे  उपायुक्त दिगांबर चव्हाणजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,  यांच्यासह विविध जिल्ह्यांतील प्रकल्प अधिकारीसहाय्यक प्रकल्प अधिकारीशिक्षण विस्तार अधिकारी व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विभागातील नागपूरचंद्रपूरवर्धागडचिरोलीभामरागडअहेरीदेवरीभंडारा व चिमूर या 9 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतील सुमारे 3000 विद्यार्थीशिक्षक व कर्मचारी सहभागी झाले आहेत. स्पर्धांचा कालावधी 13 ते 15 डिसेंबर 2025 असा असून कबड्डीखो-खोव्हॉलीबॉलहॅन्डबॉल तसेच ॲथलेटिक्समधील विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभात खेळाडूंनी संचलनक्रीडा शपथ व क्रीडा ध्वज फडकावून क्रीडावृत्तीचे दर्शन घडविले. ढोल पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच बिरसा मुंडाराणी दुर्गावती व बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुषी सिंह यांनी शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावनासमन्वय व कार्यक्षमता वाढतेतसेच विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होतेअसे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन  सपना पिंपळकर यांनी तर आभार श्री. बोंगिरवार यांनी मानले. या विभागीय क्रीडा स्पर्धांचा समारोप 15 डिसेंबर 2025 रोजी होणार असूनविजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

०००००००

No comments:

Post a Comment