Search This Blog

Friday, 27 February 2026

1 मार्च रोजी आदिवासी तसेच वधु वर परिचय मेळाव्याच्या आयोजन

 1 मार्च रोजी आदिवासी तसेच वधु वर परिचय मेळाव्याच्या आयोजन

चंद्रपूर, दि. २७ :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने 1 मार्च 2026 रोजी आदिवासी मेळावा, वधू-वर परिचय मेळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम मूल येथील स्व. मा. सा. कन्नमवार सभागृह येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास मा. पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध आदिवासी संघटना, शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिवासी महिला व पुरुष बचत गटांना विविध योजनांचे लाभ मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ट्रॅक्टर वाटप, मालवाहू गाडी वाटप, तसेच शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहांतील व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळावा, विविध योजनांअंतर्गत साहित्य वितरण व मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात ५० आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह कार्यक्रम संपन्न होणार  आहे. सर्व आदिवासी बांधवांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment