Thursday, 9 October 2025

जिल्हाधिका-यांच्या हस्ते तंबाखूमुक्त युवा अभियानाचा शुभारंभ

 



जिल्हाधिका-यांच्या हस्ते तंबाखूमुक्त युवा अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूरदि. 09 : आजपासून देशामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियानाची सुरुवात झाली आहेत्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, वांढरी यांच्या संयुक्त विद्यमानाने विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय वांढरी येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते येथे सदर अभियानाच्या शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तंबाखूचे व्यसन व नशेपासून  युवा पिढीने दूर राहावेहे अभियान आजच्या तरुण पिढीकरीता अतिशय महत्वाचे असून आजचा तरूणच उद्याचे भविष्य आहेत्यामुळे आपले आरोग्य जपणेहे आपल्याच हाती आहेतरुणांनी निरोगी राहून देश आणि समाजाच्या योगदानात सहकार्य करावे व हे अभियान यशस्वी करण्याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केलेकार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हाधिका-यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

युवा पिढीमध्ये वाढत असलेले तंबाखूचे व्यसन व ओरल कॅन्सर यांचे रुग्ण बघताया अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा वर्गाला सहभागी करून जनजागृती करण्याचा प्रयत्न व व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेतंबाखू मुक्त शाळामहाविद्यालयतंबाखूमुक्त आरोग्य संस्थाशासकीय कार्यालय, तंबाखूमुक्त गावअशा विविध संकल्पना राबवण्यात येणार आहे. तसेच फोकस ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून तंबाखूचे व्यसन सोडू इच्छिणाऱ्या लोकांकरिता विविध समुपदेशनापर कार्यक्रम सुद्धा आयोजित आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी प्रास्ताविक केलेराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर यांनी सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संस्थापक इंद्रसेन सिंगसहसचिव राहुल सिंगअंकिता सिंगप्राचार्य डॉ.राजू ताटेवारउपप्राचार्य डॉ.संदेश गोजे, जिल्हा दंतशल्य चिकित्सक डॉआकाश कासटवार, समुपदेशक मित्रांजय निरांजणेसामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरेमहाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment