Thursday, 9 October 2025

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतला आढावा




राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतला आढावा

चंद्रपूरदि. 09 : राज्याचे उद्योगसार्वजनिक बांधकामउच्च व तंत्रशिक्षणआदिवासी विकासपर्यटनमृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाचा आढावा घेतला.

यावेळी बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चव्हाणकार्यकारी अभियंता मुकेश टांगलेअक्षय पगारेजया ठाकरेप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारप्रणीव लाटकरजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्याएम.आय.डी.सीचे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरीजलसंधारण अधिकारी निलिमा मंडपेराजीव कक्कडनितीन भटारकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी राज्यमंत्री श्रीनाईक म्हणालेसुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग कामे देत नसल्याच्या ब-याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेतसुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे शासनाचे धोरण आहेत्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंत्यांना नियमानुसार कामे द्यावीततसेच चंद्रपूरमध्ये रस्त्यांची कामे अर्धवट असून ठिकठिकाणी गड्डे पडले आहेतप्राधान्याने रस्त्यावरील सर्व गड्डे बुजवावीत.

आदिवासी विकास विभागाने लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावीयाबाबत कोणतीही टाळाटाळ करू नयेचंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहेउद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्याततसेच स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण ठेवावेअशा सुचना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केल्या.

००००००

No comments:

Post a Comment