Tuesday, 20 January 2026

‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ


 

अरुणोदय’ सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

चंद्रपूरदि. 20 : जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्रदुर्गापूर येथे उत्साहात पार पडलासिकलसेल रुग्ण सीमा चानुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दुर्गापूरचे उपसरपंच प्रज्योत पुणेकर उपस्थित होतेयावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअविष्कार खंडारेतालुका आरोग्य अधिकारी डॉकोमल मुनेश्वरजिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही विशेष मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असूनमोहिमेंतर्गत सिकलसेल तपासणीनिदानमोफत उपचारसमुपदेशन व व्यापक जनजागृतीवर भर दिला जाणार आहेअशी माहिती प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी दिली.

सिकलसेल हा आजार पूर्णपणे बरा होणारा नसला तरी वेळेवर निदान व नियमित उपचारांमुळे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतोअरुणोदय अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश कुंभारे यांनी केलेकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावरील सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेश्वरसुभाष सोरते तसेच प्राआरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

००००००

No comments:

Post a Comment