Tuesday, 20 January 2026

शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना केंद्रीय सहसचिवांची भेट







 

शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना केंद्रीय सहसचिवांची भेट

चंद्रपूरदि. 20 : प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत देशातील 100 जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचाही समावेश करण्यात आला आहेया योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव तथा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे केंद्रीय नोडल अधिकारी आशिष मोरे यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

            पडोली येथे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संगिता प्रशांत मुस्कावार यांच्या पॉलीहाऊस येथे ऑरचिड कल्टीव्हेशन व ड्रॅगन फ्रुट फॉर्मची पाहणी केलीयावेळी त्यांनी ऑरचिडची रोपे कुठून आणलीकोणत्या हंगामात लावली जातातएक रोप किती काळ टिकतेयासाठी एकूण किती खर्च आलाऑरचीडची फुलांचे मार्केट कुठे आहेइतर राज्यातून मागणी होते काहोत असल्यास कशी विक्री केली जातेया रोपांना स्प्रिंकलरने किती वेळा पाणी द्यावे लागते आदी माहिती जाणून घेतलीतसेच आंब्याच्या बागेची पाहणी केल्यानंतर ड्रॅगन फ्रुटचे किती वर्षाचे नियेाजन केले आहेएका एकर मध्ये किती झाडे लावता येतात याबाबत विचारणा केलीयावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारआत्मा प्रकल्प संचालक अरुण कुसळकरउपसंचालक चंद्रकांत ठाकरेउपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार तालुका कृषी अधिकारी अनिकेत मानेशेतकरी प्रशांत मुस्कावार उपस्थित होते.

            साखरवाही (ताचंद्रपूरयेथे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्य बोटुकली संचयन कार्यक्रमाला भेट दिलीयावेळी सहसचिव मोरे यांनी तलावातून मासे कसे पकडतातयाचे प्रात्यक्षिक बघितलेया तलावात कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेतएका दिवसात किती पकडले जातातत्याची विक्री कुठे होतेमत्स्यसंवर्धन विभागाकडून अनुदान प्राप्त होते कायाची माहिती जाणून घेतलीयावेळी मच्छिमार बांधवांनी तलावाची खोलीकरण करण्याची मागणी केलीयावर नक्कीच उपाययोजन केल्या जातीलअसे श्रीमोरे यांनी सांगितले.

            भद्रावती तालुक्यात नंदोरी येथे वनक्रांती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या वतीने चालविण्यात येणा-या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र शेत बांधावरील प्रयोग शाळेला सहसचिव श्रीमोरे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतलीयावेळी ते म्हणालेयेथे येवून अतिशय चांगला अनुभव मिळालाजैविक प्रक्रियेबाबत येथील प्रयोगशाळा अतिशय उत्तम आहेपरिसरातील 500 शेतक-यांना सेंद्रीय द्रव्यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणेही अतिश्य कौतुकास्पद बाब आहे. 500 कुटुंबाची उपजिविका या युनिटवर चालतेहे काम निरंतर चालू ठेवाअसे आवाहनही त्यांनी केले.

            यानंतर चिनोरा (तावरोरायेथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे संचालक व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय सहसचिव आशिष मोरे यांनी भेट दिलीकेंद्र सरकारने जुलै 2025 मध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरू केली आहेया योजनेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवणेयोजनांचे एकत्रीकरण करणेशाश्वत शेतीला प्रोत्साहन देणेसाठवणूक क्षमता वाढवणेरोजगार निर्मिती करणे इत्यादी उद्देश समोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहेअशी माहिती आशिष मोरे यांनी दिली.

यावेळी कांचनी येथील जिनिंग व प्रेसिंग युनिटधान्य साठवणे  व प्रतवारी युनिट, 3000 मेट्रिक टन गोडाऊन ला भेट देऊन सविस्तर चर्चा केलीकांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी धोबे यांनी प्रकल्पाची माहिती व संकल्पना सांगितली तर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांनी येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारआत्मा प्रकल्प संचालक अरुण कुसळकरउपविभागीय कृषी अधिकारी  कविता हरिनखेडेतालुका कृषी अधिकारी रवी राठोडमंडळ कृषी अधिकारी विजय काळेउप तालुका कृषी अधिकारी आडकिने यांच्यासह भानूदास बोधाने कोंडाळाचंद्रहास मोरे खेमजई व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment