Monday, 11 May 2026

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली


राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली

चंद्रपूरदि. 11 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

मे रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होतेया अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन 12694 प्रकरणे, 11743 दाखलपूर्व प्रकरणे  ठेवण्यात आली होतीत्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 907 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 160 अशी एकूण 1067 प्रकरणे निकाली काढण्यात आलीयात मोटार अपघात वाहन प्रकरणे 22 निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 1कोटी 86 लक्ष 35 हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आलीदाखलपूर्व प्रकरणामध्ये 51 लक्ष 30 हजार 945 रुपये वसूल करण्यात आलेतसेच धनादेश अनादरीत झालेला प्रकरणापैकी 74 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीशसर्व वकीलसर्व न्यायालयीन कर्मचारीपोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केलेअशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एसएस इंगळे यांनी दिली.

००००००

No comments:

Post a Comment