Monday, 11 May 2026

चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी


 चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी

Ø 14 मे रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

चंद्रपूरदि. 11 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग आणि 'मॅजिक बिलियनकंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एका विशेष ऑनलॉइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 'जर्मनीमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधीया विषयावर 14 मे 2026 रोजी दुपारी ते या वेळेत हे मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टचंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना जर्मनीमधील रोजगाराच्या संधीची माहिती देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणेहे आहेतांत्रिक कौशल्य असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक स्तरावर करिअरची संधी खुली व्हावीयासाठी शासन स्तरावरून हा प्रयत्न केला जात आहे.       

या वेबिनारमध्ये आयटीआय किंवा कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीरोजगाराच्या शोधात असलेले इच्छुक उमेदवारतांत्रिक कौशल्य असलेले युवक सहभागी होऊ शकतातउमेदवारांना सहभागी होण्यासाठी 'Google Meet' ची लिंक https://meet.google.com/mqp-wyad-nbo उपलब्ध करून देण्यात आली आहेतसेचअर्जासाठी दिलेल्या Google form https://forms.gle/tgiFD-TogDR४५CqN९ लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधी लाभ घ्यावाअसे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहेअधिक माहितीसाठी 07172- 252292  या दूरध्वनी क्रमांकावर तसेच या कार्यालयाशी संपर्क करावा.

००००००

No comments:

Post a Comment