Monday, 11 May 2026

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण

Ø औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी परिपूर्ण इको सिस्टीम उभारण्यासाठी सर्व प्रयत्न

Ø महाराष्ट्राचा 2047 पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

नवी दिल्ली / चंद्रपूरदि. 11 : पायाभूत सुविधानाविण्यपूर्णताप्रतिभास्वच्छ ऊर्जासुव्यवस्थित शहरीकरणतंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहेही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने  आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहेजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून  त्यासाठी सर्व आघाड्यांवर  जाणीवेने प्रयत्न  सुरू असल्याची ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआयआजपासून आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट - 2026   या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत आज सकाळच्या सत्रात झालेल्या Vision For India @100 परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते

सध्याचा क्षण हा भारतासाठी बदलाची व्याख्या ठरवण्याचा आहेअसे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणालेआजचे जग एकाच वेळी अनेक स्थित्यंतरातून जात आहेयात भू-राजकीय विखंडनतांत्रिक उलथापालथऊर्जा संक्रमणपुरवठा साखळीतील बदल आणि आर्थिक विकासाच्या भविष्याबद्दलची मोठी अनिश्चितता यांचा समावेश आहेमात्रया अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव देश मोठ्या प्रमाणावर जगाचा आत्मविश्वास वाढवत आहेआमच्याकडे  स्थैर्यमहत्त्वाकांक्षालवचिकता आणि अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता आहेपंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीभारताने गेल्या दशकात स्वतःबद्दल जागतिक स्तरावर नवी प्रतिमा स्थापित केली आहे.

पंतप्रधानांच्या  द्रष्टया धोरणांची अंमलबजावणी राज्यांनाच करावी लागेलअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेदशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे 'इकोनॉमिक इंजिनराहिले आहेजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोतआज महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहेजी भारताच्या जीडीपीमध्ये  सुमारे 15 टक्के योगदान देतेभारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहेभारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20 टक्क्यांहून अधिक असून देशाची 'डेटा सेंटरआणि 'स्टार्टअपराजधानी आहेअसे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

भविष्यातील महाराष्ट्राबाबत आमचा रोड मॅप  स्पष्ट आहे.  2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांपैकी महाराष्ट्र राहीलअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेयावर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राने जवळपास 30 लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आणलेभविष्यातील अर्थव्यवस्था ही महामार्गबंदरेविमानतळडिजिटल नेटवर्क्ससंशोधन प्रयोगशाळास्टार्टअप इकोसिस्टम आणि विद्यापीठांवर उभी असेल आणि म्हणूनच महाराष्ट्रात अभूतपूर्व वेगाने गुंतवणूक होत आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसमृद्धी महामार्गनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाढवण बंदरमेट्रोचे जाळेऔद्योगिक कॉरिडॉरलॉजिस्टिक इकोसिस्टमडिजिटल पायाभूत सुविधा आदी प्रकल्प एकत्रितपणे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल बदलवत आहेतभविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठीची क्षमता एआय,  सेमीकंडक्टर्स,  इलेक्ट्रिक वाहने , प्रगत उत्पादनेस्वच्छ ऊर्जाडेटा सेंटर्सजागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स ) आणि 'डीप-टेककल्पकतेवर आधारित असेल.

आज महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठ्या जीसीसी केंद्रांपैकी 24 टक्के केंद्रे आहेतआशियातील सर्वात महत्त्वाचा 'डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉरम्हणून महाराष्ट्र उदयास येत आहे.  देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेतदेशातील 20 टक्के ऑटोमोबाईल उत्पादने आणि ईव्ही उत्पादनात आम्ही आघाडीवर आहोतमहाराष्ट्रात डिझाइननवनिर्मिती आणि  जागतिक बौद्धिक संपदा निर्माण करण्याची आमची महत्वाकांक्षा आहे.

मुंबई जागतिक आर्थिक आणि नाविन्यपूर्ण राजधानी म्हणून विकसित होत राहीलपुणे उत्पादनतंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र म्हणून आपली पकड मजबूत करेलनागपूर हे भारताचे लॉजिस्टिक आणि भौगोलिक-धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येत आहेछत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे आमचे नवीन युगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असतीलगडचिरोली हे 2032 पर्यंत भारताचे सर्वात मोठे 'ग्रीन स्टीलउत्पादक जिल्हा बनेलआणि आमची द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे औद्योगिक विकासाची पुढची इंजिने ठरतीलसंतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाहीतर तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.

सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष  राजीव मेमाणी  यांनी आपल्या प्रास्ताविकात मुखमंत्र्याच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव केला.

०००००

No comments:

Post a Comment