Thursday, 7 May 2026

8 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूरदि. 07 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर आणि मॉडल करिअर सेंटर या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावीया हेतूने महिन्यातील दुसऱ्या व चवथ्या शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येतेया अनुषंगाने 8 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रप्रशासकीय भवन चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वीआय.टी.आय., पदविकापदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेया प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 50 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून 1) गोपानी आर्यन अॅन्ड स्टिल प्रा.लिचंद्रपूर 2) भारत पे प्रालिचंद्रपूर 3) राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेजचंद्रपूर द्वारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उमेदवार भरावयाची असल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे.

तरी मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रतीउपस्थित राहावेअधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रदुरध्वनी क्रमांक 07172- 252295 येथे संपर्क करावाजिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपुर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment