Friday, 7 August 2026

लिपिक टंकलेखक पदासाठी 12 ऑगस्ट रोजी मुलाखत


 लिपिक टंकलेखक पदासाठी 12 ऑगस्ट रोजी मुलाखत

Ø माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 07 :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर करीता माजी सैनिक प्रर्वगातून अशासकीय व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने लिपिक टंकलेखक पद भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छुक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मुळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखाती करीता हजर राहावे. अशासकीय लिपिक टंकलेखक या पदाकरीता इंग्रजी, मराठी टंकलेखन व संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,

असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment