Search This Blog

Saturday, 9 May 2020

लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक सेवा देणाऱ्या पारंपारिक व्यावसायिकांना पालकमंत्र्यांची मदत



लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक सेवा देणाऱ्या
पारंपारिक व्यावसायिकांना पालकमंत्र्यांची मदत
ब्रह्मपुरी व सिंदेवाहीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या 500 किट वाटप
चंद्रपूर, दि. 9 मे : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या ऑटोचालकरिक्षाचालक, केशकर्तनालयाचे व लॉन्ड्री व्यवसायात काम करणाऱ्या बारा बलुतेदारातील नाभिक व धोबी समाजातील व्यावसायिकांना राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आज वाटप केले.
जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शनिवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या दीर्घ काळामध्ये नियमित व पारंपारिक व्यवसायाला देखील खोळंबा झाला आहे. यामुळे रोजच्या व्यवसायावर पोट चालणाऱ्या नागरिकांचे देखील नियमित व्यवसाय बंद पडले आहे. तर काहीजण अशा गंभीर परिस्थितीतही आजारी, गरजवंत लोकांसाठी घराबाहेर पडून सेवा देत आहेत. यामध्ये ऑटो चालक व रिक्षाचालकांचा प्रामुख्याने समावेश होतो. यासर्व व्यावसायिकांच्या व्यथा ऐकून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील ऑटोचालकरिक्षाचालककेशकर्तनालय चालविणारे नाभिक समाजाचे, लॉन्ड्री चालवणारे व्यवसाय करणारे धोबी समाजाचेगरजवंतांना गट निहाय आज स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप केल्या. सोबतच त्यांना हात खर्चासाठी 500 रुपये रोख देण्यात आले.
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचा काळ कमी व्हावाजिल्हा अंतर्गत व्यवसाय सुरू व्हावेशारीरिक दुरी राखून व्यवहार सुरू व्हावेतयासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुढील काळात कोरोना आजाराचा प्रसार होणार नाही. यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहनही,त्यांनी केले.
व्यक्तिगत स्तरावर ही मदत दिली जात असून शासनाच्या विविध योजना मार्फतही गरजूगरीब व आवश्यक जनतेपर्यंत अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही वडेट्टीवार यांनी यावेळी केले. ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष रेखाताई उराडेसिंदेवाही नगराध्यक्ष आशाताई गंडातेजि.प. सदस्य राजेश कांबळेप्रमोद चिमुरकरहेमराज तिडकेरमाकांत लोदेसीमाताई सहारेप्रभाकर शेलोकारबाळाभाऊ राऊतसुनील उटलवारस्वप्नील कावडेनितीन उराडे आदींनी या वाटपाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
00000

No comments:

Post a Comment