चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून होणारे लॉकडाऊनला सध्या स्थगिती: अजय गुल्हाने
चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून एक आठवडा लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा 29 ऑगस्टला पालकमंत्री ना. विजय वडडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन नाही परंतु, 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू असणार आहे. याविषयीचा आदेश काढण्यात आलेला आहे. प्रवासासाठी ई-पास परवान्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत चालू राहतील. तथापि मेडिकल औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहणार आहे.
00000

No comments:
Post a Comment