Search This Blog

Monday, 14 September 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर  जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पूर नुकसानीबाबत व कोरोना विषयक घेणार आढावा बैठक

चंद्रपूर दि. 14 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक  15 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 15 सप्टेंबर मंगळवार रोजी  सकाळी 8 वाजता गडचिरोली वरून भद्रावती जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह भद्रावती येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या पुरामुळे नुकसानीबाबत व केंद्रीय पथक यांनी पाहणी केलेल्या पूर नुकसानीबाबत आढावा तसेच कोविड-19 संदर्भाने अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 1.00 ते 1.30 राखीव असून दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment