14 ऑगस्ट रोजी “विभाजन विभीषिका स्मृतिदिवस”
Ø प्रशासनातर्फे आयोजित प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 13 ऑगस्ट : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार 14 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे “विभाजन विभीषिका स्मृतिदिवस” साजरा करण्यात येत आहे. दि. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या यातना झाल्या, मनस्ताप आणि दुःख भोगावे लागले त्याची कल्पना यावी, यादृष्टीने “विभाजन विभीषिका स्मृतिदिवस” म्हणजेच “फाळणी दुःखद स्मृतिदिन” घोषित करण्यात आला आहे.
त्यानिमित्याने प्रदर्शनीचे व देशभक्तीपर गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची विशेषत्वाने काळजी घेण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन 13 ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे होणार असून 14 ऑगस्ट रोजी ही प्रदर्शनी महानगरपालिका कार्यालयात सर्व नागरिकांकरीता खुली असणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment